इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र

 
 
 
 

विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२३-२०२४

 
‘इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र’ तर्फे विद्यार्थ्यांसाठी इतिहासविषयक निबंधस्पर्धा गेली अनेक वर्षे तीन गटांत घेण्यात येतात.
लहान गट: इयत्ता ५ वी ते ७ वी
मोठा गट: इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी
वरिष्ठ गट: इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी
ही निबंधस्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येते. ही स्पर्धा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांतून असते.

स्पर्धेचे स्वरूप: शाळास्तरावर विषयानुसार वरील तीन गटांत स्पर्धा आयोजित करावी. शाळेतील इतिहास शिक्षकांनी ते निबंध तपासून त्यामधून प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाचे निवडक एकूण ९ ते १२ निबंध महामंडळाच्या ‘कोल्हापूर कार्यालया’ कडे विद्यार्थी यादीसह पाठवावेत. निबंधस्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना कोणतेही शुल्क नाही, ही स्पर्धा विनामूल्य आहे. मात्र निबंधावर मुख्याध्यापकांची शिफारस, सही व शिक्का असणे आवश्यक आहे. शिक्षकबंधूंनी सहकार्य करावे.

निबंध पाठविण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२३.

विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे विषय


लहान गट: इयत्ता ५ वी ते ७ वी (शब्दमर्यादा: ५०० शब्द)
सामाजिक विकासासाठी आवयश्क घटक व सामाजिक गुणांची जोपासना (Social aspects for the Social Development)

मोठा गट: इयत्ता ८ वी व १० वी (शब्दमर्यादा: ७५० शब्द)
भारतीय लोकशाहीतील आव्हाने (Challenges in Indian Democracy)

वरिष्ठ गट: इयत्ता ११ वी व १२ वी (शब्दमर्यादा: १००० शब्द)
आधुनिक काळातील लोकशाहीमधील वृतपत्राचे महत्त्व (Importance of newspaper in democracy in the modern period)
सूचना:
  • निबंधाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता व शाळेचे नाव पूर्ण पत्त्यासह लिहावे, तसेच त्यावर वर्ष २०२३-२४ लिहावे.
  • निबंध सुवाच्य व फुलस्केप कागदावर एकाच बाजूवर लिहिलेला असावा.
  • मुख्याध्यापकांनी सही-शिक्क्यासह निबंध पाठवताना शाळेच्या लेटरहेडवर विद्यार्थ्यांच्या नावाची यादी सोबत जोडावी.
  • मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे निबंध व शाळेचा पूर्ण पत्ता- पिनकोडसह व शाळेचा पूर्ण पत्ता – पिनकोडसह व शाळेचा फोन नं. किंवा संपर्क मोबाइल नंबर
    तसेच विद्यार्थ्यांचा घरचा पत्ता व संपर्क मोबाइल क्रमांक, विद्यार्थ्यांची इयत्ता लिहिले आहे ते तपासून कोल्हापूर येथील कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावेत.
    ज्या शाळा निबंधस्पर्धेत व परीक्षा स्पर्धेत दोन्ही ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यांनी निबंध व विद्यार्थी यादी फक्त कोल्हापूर येथे पाठवावेत. पुणे कार्यालयाकडे पाठवू नयेत.

प्रत्येक गटात प्रत्येक माध्यमात पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिके व विशेष गुणवत्ता प्रशस्तिपत्रे देण्यात येतात. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या निबंधाना ‘इतिहास शिक्षक’ त्रैमासिकात प्रसिद्धी दिली जाते. निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याना सहभागाची प्रशस्तिपत्रे देण्यात येतात.
 
 
© Itihas Shikshak Mahamandal, Maharashtra
Developed and Maintained by
SMART COMPUTER (INDIA) PVT. LTD.