इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र

 
 
 
 

राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा

शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४

 
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपला व्यक्तिमत्व विकासासाठी 'इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा' ही एक सुवर्णसंधी उपलब्ध करीत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांना इतिहास नागरीकशास्त्र / राज्यशास्त्र हे विषय अनिवार्य आहेत. त्यामुळे या विषयांचे महत्व पटू लागले आहे. या विषयांचे महत्व शालेय स्तरावर लक्षात यावे व त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात यशस्वी वाटचाल करणे शक्य व्हावे, या सद्हेतूने 'इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र' तर्फे 'इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा' (इ. ५ वी, इ. ६ वी, इ. ७ वी -बाल प्रज्ञावंत इ. ८ वी, इ. ९ वी -किशोर प्रज्ञावंत व इ. १० वी -कुमार प्रज्ञावंत) सुरु केलेल्या आहेत.'पुणे व कोल्हापूर या ठिकाणी दोन कार्यालये' सुरु करण्यात आलेली आहेत.
 
यावर्षी इ. ५ वी ते इ. १० वी या सर्व वर्गांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी ही परीक्षा शनिवार, दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
 
 
 

परीक्षेबाबत माहिती

  • इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे.
  • या परीक्षेत इतिहास व नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र या विषयांचा समावेश आहे.
  • ही परीक्षा मराठीइंग्रजी या दोन मध्यमांत असेल.
  • उत्तीर्ण होण्यास किमान ४० गुण आवश्यक आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यशस्वी झाल्याबद्दल महामंडळातर्फे प्राशस्तिपत्रके देण्यात येतील.
  • राज्यात प्रत्येक इयत्तेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांस विशेष गुणवत्ता प्रशस्तीपत्र महामंडळतर्फे देण्यात येईल.
  • प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्रमांकास महामंडळातर्फे विशेष गुणवत्ता प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
  • प्रत्येक शाळेस प्रशस्तीपत्र व संबंधित इतिहास शिक्षकांनाही प्रोत्साहानपर प्रशस्तीपत्र देण्यात येतील.
 
 

परीक्षेचा अभ्यासक्रम

  • बाल प्रज्ञावंत इयत्ता ५ वी : इ. ४ थी चा संपूर्ण अभ्यासक्रम व इयत्ता ५ वी चा परिसर भाग २ (इतिहास) प्रकरण १ ते ६, परिसर भाग १ (ना. शास्त्र) मधील प्रकरण ५ व ६
  • बाल प्रज्ञावंत इयत्ता ६ वी : इ. ५ वी चा संपूर्ण अभ्यासक्रम (इतिहास व नागरिकशास्त्र - इ. ६ वी इतिहास प्रकरण १ ते ६ व नागरिकशास्त्र १ ते ३)
  • बाल प्रज्ञावंत इयत्ता ७ वी : इ. ६ वी चा संपूर्ण अभ्यासक्रम (इतिहास व नागरिकशास्त्र) इ. ७ वी इतिहास प्रकरण १ ते ७ व नागरिकशास्त्र १ ते ३
  • किशोर प्रज्ञावंत इयत्ता ८ वी : इ. ७ वी संपूर्ण अभ्यासक्रम (इतिहास व नागरीकशास्त्र) इ. ८ वी इतिहास प्रकरण १ ते ८ व नागरिकशास्त्र १ व ३
  • किशोर प्रज्ञावंत इयत्ता ९ वी : इ. ८ वी संपूर्ण अभ्यासक्रम (इतिहास व नागरीकशास्त्र) इ. ९ वी इतिहास प्रकरण १ ते ५ व राज्यशास्त्र १ ते ३
  • कुमार प्रज्ञावंत इयत्ता १० वी : इ. १० वी चा इतिहास व राज्यशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम.
 
 

नाव नोंदणी व इतर

  • शाळाप्रमुखांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या इयत्तेनुसार तयार करून कोल्हापूर किंवा पुणे विभागाकडे पाठवाव्यात.
  • यादीवर मुख्याध्यापकांची सही व शिक्का आवश्यक राहील. शाळेचा पूर्ण पत्ता पिनकोडसहीत तसेच शाळेचा दूरध्वनी क्रमांक STD कोडसहित व
    संबंधित शिक्षकाचा मोबाइल नंबर तसेच E-mail ID असणे आवश्यक आहे. अन्यथा शाळेशी संपर्क ठेवणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी. शक्यतो ई-मेल ने याद्या पाठवाव्यात. (itihaspradnya@gmail.com)
  • उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या छापील नावांसह व क्रमांकासह परीक्षेच्यावेळी देण्यात येतील. संबंधित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांसाठी तिचा वापर करता येणार नाही.
  • गैरहजर विद्यार्थ्याची कोरी उत्तरपत्रिका परत पाठवावी.
  • परीक्षेचे सर्व काम संगणकीकृत असल्याने परीक्षा विभागाकडे पूर्वी दिलेल्या यादीव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांचा परीक्षेत समावेश करता येणार नाही.
  • सर्व शाळांनी परीक्षेनंतर फक्त उत्तरपत्रिका एकाच पार्सलने फक्त पुणे येथील कार्यालयात पाठवाव्यात.
 
 

परीक्षाशुल्क व इतर बाबी

  • परीक्षाशुल्क प्रतिविद्यार्थी Rs. ५०/- राहील. Rs.४०/- प्रमाणे होणारे महामंडळ कार्यालयाकडे पाठवावेत.
  • विद्यार्थ्याची किमान संख्या ३० असावी. ( १० पेक्षा कमी विद्यार्थ्याची यादी पाठवू नये.)
 
 

परीक्षाकेंद्र खर्चाबाबत

  • शाळेकडे प्रतिविद्यार्थी ₹ १०/- प्रमाणे जमा झालेल्या रकमेतून खालीलप्रमाणे खर्च करावा.
    (किमान विद्यार्थी संख्या ३० प्रमाणे विचारात घेऊन खालील खर्च दिलेला आहे.)
    १) केंद्रसंचालक मानधन ₹ १००/-
    २) पर्यवेक्षक मानधन ₹ ७५/- (५० विद्यार्थीपर्यंत १ पर्यवेक्षक)
    ३) सेवक मानधन ₹ ४०/- व उर्वरित रक्कम पोस्टेज व बँक कमिशनसाठी वापरावी.
  • ‘इतिहास व शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र’ याच नावाचा Payable at Pune किंवा Payable at Kolhapur असा डी. डी. काढावा
    व यादीसोबत सर्व तपशील भरून पोस्टाने अथवा कुरीअरने पाठवावा.
  • बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत ऑन अकाऊंट पैसे इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र, या नावेच पुणे/ कोल्हापूर यापैकी
    ज्या ठिकाणी विद्यार्थी यादी पाठवणार त्याच ठिकाणी बँकेत खात्यावर पैसे भरावे.
  • बँक ऑफ महाराष्ट्र – नारायण पेठ शाखा, पुणे सेव्हिंग्ज खाते क्र. २०१२४५४२७४० IFSC: MAHB0000154
    बँक ऑफ महाराष्ट्र – राजारामपुरी शाखा, कोल्हापूर सेव्हिंग्ज खाते क्र. २००४१०१४५१८ IFSC: MAHB0000410
    बँकेच्या चलनाची काऊंटरफॉईलची झेरॉक्स प्रत मिळाल्याशिवाय परीक्षाशुल्क मिळाले असे समजले जाणार नाही. काऊंटरफॉईलवर शाळेचे नाव लिहिणे आवश्यक आहे. विद्यार्थी यादीच्या शेवटी परीक्षा शुल्काचा तपशील नीट भरावा.
  • इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांच्या याद्या य परीक्षाशुक्ल पाठविण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२३ ही राहील.
 
 
 

केंद्रात सामूहिक कॉपीचा संशय आल्यास सदर निकाल राखून ठेवण्याचा अधिकार महामंडळाकडे राहील. परीक्षेच्या निकालाचा अंतिम निर्णय महामंडळाचा राहील. ३१ मार्च २०२४ पर्यंत शाळेस परीक्षेचा निकाल मिळाला नाही तर महामंडळाशी ताबडतोब संपर्क साधावा.

 
 
© Itihas Shikshak Mahamandal, Maharashtra
Developed and Maintained by
SMART COMPUTER (INDIA) PVT. LTD.